Mumbai Metro Update: मुंबईतील मेट्रो 3 म्हणजेच पहिल्या भूमिगत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गिकेतील पुढील टप्पा लवकरच सुरु होऊ शकतो. अहवालानुसार, बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील रुळाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. आता काल एमएमआरसीच्या एमडी अश्विनी भिडे यांनी श्री एस.के. गुप्ता संचालक (प्रकल्प), श्री राजीव संचालक (सिस्टम्स) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांना भेट देऊन शिल्लक कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुंबई मेट्रो लाईन 3 चे काम जोरात सुरु आहे. मेट्रो लाइन 3 चा दुसरा टप्पा 2 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या विभागात धारावी, शितळादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या सहा प्रमुख मेट्रो स्थानकांचा समावेश असेल. येत्या जून ते जुलै दरम्यान मेट्रोचा हा संपूर्ण मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 मार्गिकेची एकूण लांबी 33.5 किलोमीटर इतकी आहे. या लाईनवर एकूण 27 स्थानके आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मुंबईतील एक्वा लाइन 3 मेट्रोने प्रवास करणे आणखी सोपे आणि सोयीस्कर होईल. मुंबईची वाहतूक समस्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. (हेही वाचा: Metro Line 3 Ridership: मुंबईच्या महत्वाकांक्षी मेट्रो लाईन 3 वर पहिल्या तीन महिन्यांत दिसली निराशाजनक रायडर्स संख्या; जास्त दर व कनेक्टिव्हिटीच्या अभावाने केली प्रवाशांची निराशा)

Mumbai Metro Update:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)