Weather Forcast Today: आज, १५ जानेवारी रोजी मुंबईत अंशत: ढगाळ वातावरण आणि धुके जाणवेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. हिवाळा कमी झालेला दिसतो आणि आर्द्रता आली आहे. हवेतील धुक्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता निर्माण झाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५ किमीपर्यंत घसरला असून आर्द्रता ५८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, परिणामी आज दिवसभर उबदार आणि ढगाळ वातावरण आहे. बुधवारी सकाळी दिल्लीच्या काही भागात धुक्याचा दाट थर पसरला, ज्यामुळे शहरातील दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. अग्नेय अरबी समुद्रामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही झाला आहे.थंडीच्या वाढत्या लाटेमुळे संपूर्ण उत्तर भारतातील वायू प्रदूषण वाढले आहे. उत्तर पश्चिम भारतात पुढच्या 24 तासात कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. मात्र पुढचे 3 दिवस तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस किमान तापमानात 3 डिग्री सेल्सियसने वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी होणार असून उष्णता वाढेल.
राज्यात गारठा कमी झाला मात्र धुकं पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिल्यामुळे तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यात काही भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी देखील पडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट दिला आहे. उत्तर भारतात 110 नॉट्स वेगाने वारे तर पश्चिमेकडूनही जोरदार वारे वाहात आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात,उत्तर महाराष्ट्रसह आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं अंदाज वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.ल काही भागांमध्ये उद्या अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.