India Women vs Ireland Women, 3rd ODI Match Live Score Update: दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. तर, आयर्लंडचे नेतृत्व गॅबी लुईसकडे आहे. दरम्यान, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत पाच गडी गमावून 435 धावा केल्या.
आयर्लंड संघाला दुसरा धक्का:
3RD WODI. WICKET! 3.5: Coulter Reilly 0(4) b Sayali Satghare, Ireland (Women) 24/2 https://t.co/xOe6thhPiL #INDvIRE @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी आयर्लंड संघाला 50 षटकांत 436 धावा कराव्या लागतील. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आयर्लंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कुल्टर रेली शून्य धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली.