भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आजपासून सुरू होत आहे. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्टेडियमवर पोहोचले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) पहिल्या दिवसाचा खेळ पाहणार आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टाॅसपूर्वी, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या क्रिकेट संघाच्या कर्णधाराचा गौरव केला आणि विशिष्ट कसोटी सामन्यासाठी त्याला विशेष कॅप दिली. यानंतर दोन्ही नेत्यांनी खास वाहनातून स्टेडियमचा फेरफटका मारला. यादरम्यान स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)