टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची लेक वामिका (Vamika) हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मात्र अद्याप विरुष्काने लेकीचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. दरम्यान, विराट आणि इतर खेळाडून सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. या काळात विराट आपल्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर Q&A खेळत होता. त्यादरम्यान विराटला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची त्याने मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत.
एका चाहत्याने विराटला वामिका नावाचा अर्थ विचारत तिची एक झलक दाखवण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना विराटने लिहिले, "वामिका हे मॉं दुर्गेचे दुसरे नाव आहे." तर तिची झलक दाखवण्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, "नो. जोपर्यंत तिला सोशल मीडिया काय आहे हे कळत नाही आणि ते वापरण्यासाठी ती सक्षम होत नाही तोपर्यंत तिची तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही (अनुष्का आणि मी) एकत्रितपणे घेतला आहे." (विराट-अनुष्का च्या मुलीच्या 'वामिका' नावामागे दडलाय इतका सुंदर अर्थ, जाणून घ्या सविस्तर)
11 जानेवारी 2021 रोजी 'वामिका' जन्म झाला असून ती अवघ्या चार महिन्यांची आहे. मात्र विराट आणि अनुष्का दोघांनीही कामाला सुरुवात केली आहे. (विरुष्काच्या मुलीचं नाव आलं समोर, अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबत शेअर केला लेकीचा गोंडस Photo)
क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर विराट टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. तिथे हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18-23 जून दरम्यान होईल. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल.