Virat-Anushka Baby Girl Vamika Meaning: विराट-अनुष्का च्या मुलीच्या 'वामिका' नावामागे दडलाय इतका सुंदर अर्थ, जाणून घ्या सविस्तर
माता-पिता बनलेल्या विराट-अनुष्काने तिच्या नावामागचे पडदा उठवला अशून तिचे नाव 'वामिका' (Vamika) ठेवले असल्याचे सांगितले. हेच नाव का ठेवले असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचेही तितके खास कारण आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरी 11 जानेवारी 2021 ला एक गोंडस तान्हुलीने जन्म घेतला. तिच्या येण्याने त्यांच्या संपूर्ण कुटूंबियांसह त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. पिता बनलेल्या विराटने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली. ही मुलगी दिसायला कशी असणार आणि हिचे नाव काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. तर माता-पिता बनलेल्या विराट-अनुष्काने तिच्या नावामागचे पडदा उठवला अशून तिचे नाव 'वामिका' (Vamika) ठेवले असल्याचे सांगितले. हेच नाव का ठेवले असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचेही तितके खास कारण आहे.
विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे वामिकाचा अर्थ... वामिका नावाचा अर्थ आहे 'देवी दुर्गा'.. हे हिंदू नाव असून वामिका हे एक देवी दुर्गेचे स्वरुप असल्याचे सांगितले जाते.हेदेखील वाचा- Virat Kohli-Anushka Sharma Daughter Name: विरुष्काच्या मुलीचं नाव आलं समोर, अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबत शेअर केला लेकीचा गोंडस Photo
View this post on Instagram
अनुष्काने आपल्या पती आणि मुलीसोबत एक क्युट फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्याखाली तिने म्हटले आहे की, "आम्ही जीवनशैली प्रेम, उपस्थिती आणि कृतज्ञतेसह एकत्र जगत आहोत परंतु या लहान मुलीने, वमिकाने संपूर्ण नवीन स्तरावर नेले आहे! अश्रू, हशा, काळजी, आनंद - कधीकधी काही मिनिटाच्या कालावधीत अनुभवल्या गेलेल्या भावना. झोप मायावी आहे परंतु आमची अंतःकरण भरले आहेत. आपल्या शुभेच्छा, प्रार्थना आणि चांगल्या ऊर्जेसाठी आपणा सर्वांचे आभार."
अनुष्काने 11 जानेवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वामिकाला जन्म दिला. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2017 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2021 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

