अनुष्कासोबत विराट कोहलीने साजरा केला 'करवा चौथ'चा सण; पत्नीसाठी ठेवला दिवसभर उपवास (Photo)
Virat Kohli And Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

आज देशभरात करवा चौथचा (Karwa Chauth) सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. अशा उत्सवांच्या काळात आपले आवडते सितारे सण कसा साजरा करतात याकडे लोकांच्या नजरा लागलेल्या असतात. यामध्ये क्रिकेट विश्वातील विराट कोहली (Virat Kohali) आणि चित्रपटसृष्टीमधील अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या जोडीबाबतही लोकांना उत्सुकता होती. आता या जोडीचा करवा चौथचा फोटो समोर आला आहे व बघता बघता हा व्हायरल होण्यास सुरुवातही झाली आहे. विराटने आपल्या सोशल मिडीयावर हा फोटो शेअर केला आहे. या सणासाठी विराटने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे तर अनुष्काने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. भांगेत सिंदूर, हातात चुडा, दागिने असा थाटात अनुष्का फारच सुंदर दिसत आहे.

करवा चौथ व्रत मुख्यत्वे उत्तर भारतातील सौभाग्यवती स्र्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवतात. दिवसभर निर्जळी व्रत करून, रात्री चाळणीमधून चंद्राला आणि पतीला पाहुन हे व्रत सोडले जाते. अनुष्कानेही विराटसाठी हे व्रत केले होते. महत्वाचे म्हणजे विराट कोहलीने देखील अनुष्कासाठी आज उपवास केला होता. दोघांचा फोटो पोस्ट करताना त्याने ‘The ones who fast together laugh together, Happy karvachauth’ असे कॅप्शन दिले आहे. यावरून दोघांमध्ये असलेले प्रेम दिसून येते.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले होते. दोघांनी लग्नासाठी इटलीची निवड केली होती, जिथे अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत दोघेही विवाहबंधनात अडकले होते. विरुष्काचा यंदाचा दुसरा करवा चौथ आहे. विराट सोबतच शिखर धवन, गौतम गंभीर, भुवनेश्वर कुमार यांनीदेखील आपापल्या पत्नींसोबत हा सण साजरा केला आहे.