भारतीय संघाचा आणि आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याच्या सोबत शुक्रवारी इंस्टाग्रामवर संवाद साधला. या दरम्यान दोघांनी मिळून भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) खेळाडूंचा समावेश असलेला एक संयुक्त संघ स्थापन केला. या संघात, जिथे भारताचे सात आणि दक्षिण आफ्रिकेच्या चार खेळाडूंनी स्थान मिळवले. दोन्ही दिग्गज फलंदाजांनी एकमताने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला संघाचा कर्णधार बनवले. याव्यतिरिक्त, भारताला विश्वविजेते बनवणार्या गॅरी कर्स्टन यांना संघाचा प्रशिक्षक बनविण्यात आले.इंस्टाग्राम वर लाईव्ह चॅट दरम्यान दोघांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. यात आयपीएल, सध्य कोरोना व्हायरस आणि काही अन्य मजेदार गोष्टींचा समावेश आहे. (Coronavirus: कोरोनाग्रस्तरांच्या मदतीसाठी विराट कोहली याने पुन्हा घेतला पुढाकार, एबी डिव्हिलियर्स याच्या साथीने अशा प्रकारे करणार आर्थिक मदत)
कोहली आणिडिव्हिलियर्सच्या या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट, डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), युवराज सिंह, युजवेंद्र चहल, डेल स्टेन, जसप्रीत बुमराह आणि कगिसो रबाडा यांचा समावेश करण्यात आला. डिव्हिलियर्सने संघासाठी 6 खेळाडूंची निवड केली तर कोहलीने पाच खेळाडूंची निवड केली. डिव्हिलियर्सशी बोलताना विराटने सांगितले की जोपर्यंत तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळत नाही तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ सोडणार नाही. आरसीबीने तीन वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली पण एकदाही त्याला जेतेपद जिंकता आले नाही.
गेल्या महिन्यात आयपीएलचे आयोजन होते पण कोरोना व्हायरसमुळे त्याला स्थगित करण्यात आले. याविषयी विराट म्हणाला की, "याक्षणी आपण याबद्दल स्पष्ट नाही. तथापि, मला आशा आहे की अशी वेळ येईल जेव्हा यावर काहीतरी होईल." कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअर सुरू केल्याची वेळही आठवली. तो म्हणाला की, :त्यावेळी नवीन क्रिकेटपटूंमध्ये व्यवस्थेबद्दल खूप आदर होता. जे नवीन क्रिएकटपटू येतील त्यांनी 500-600 धावा कराव्या असे मला वाटते. युवा खेळाडूंनी बंधनं तोडून खेळावे अशी माझी इच्छा आहे. जेव्हा आपण असे करता तेव्हा आपण काहीतरी खास कराल."