सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी (Photo Credit: Getty Images and Twitter)

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने मंगळवारी चांगला मित्र आणि भारतीय संघाचा माजी सहकारी विनोद कांबळी (Vinod Kambli) ला आव्हान केले आणि कार्य पूर्ण करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली. सचिनने 2017 मध्ये गायक सोनू निगमसोबत 'क्रिकेट वाली बीट' (Cricket Wali Beat) नावाचे गाणे सादर केले होते, जे विश्वचषकात खेळलेल्या त्याच्या सहकारी क्रिकेटपटूंना समर्पित होते. आपल्या मित्राला टॅग करीत सचिनने एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "श्री. कांबळी, मी आव्हान देतो की माझ्या #क्रिकिटवालीबिट 'या गाण्याचे रॅप तुम्ही करावे! तुमच्याकडे 1 आठवडा आहे." क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या या खेळाडूने खेळाची एक नवीन व्याख्याच लिहिली आहे. सचिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (ऑस्ट्रेलिया बुशफायर रिलीफ क्रिकेट बॅशसाठी सचिन तेंडुलकर, कर्टनी वॉल्श सज्ज; मास्टर-ब्लास्टर दिसणार नवीन भूमिकेत)

सचिनने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो आणि विनोद संभाषण करताना दिसत आहे. सचिनने त्याला त्याला 'क्रिकेट वाली बिट' गाण्याचे रॅप करायाला सांगितले ज्याच्यावर कांबळी म्हणाला की त्याला या गाण्याचे सर्व नोट माहित आहे. यादरम्यान, कांबळीने काही डान्स मूव्ह देखील दाखवले. सचिनने जेव्हा त्याला गाणे रॅप करायला सांगितले तेव्हा कांबळी म्हणाला कि हे एक मुश्किल चॅलेंन्ज आहे. मात्र, मास्टर-ब्लास्टरने दिलेले हे चॅलेंज कांबळी पूर्ण करू शकतो की नाही आणि किती दिवसात तो हे पूर्ण करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. पाहा हा व्हिडिओ:

मूळ गाण्यामध्ये तेंडुलकरने 90 च्या दशकात भारतासाठी खेळलेल्या विविध क्रिकेटपटूंची नावे लिहिली आहेत. आपल्या आव्हानात सचिनने कांबळीला सर्व नावे लक्षात ठेवून रॅप करण्यास सांगितले. या गाण्यात सचिनने कशाप्रकारचे शॉट मारले, त्याला स्टेडियममध्ये कसा प्रतिसाद मिळाला हे देखील दाखवण्यात आले आहे. हे गाणं सचिनने सोनू निगमबरोबर गायले आहे. 18 जानेवारी रोजी विनोद कांबळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने त्याच्या ट्विटमध्ये शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, शाळेच्या काळात कांबळी एक चांगला गायक आणि "त्याहूनही चांगली नर्तक" आहे हे मला माहित आहे. सचिन आणि कांबळीने भारतीय एकाच प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षण घेतले, त्यांच्या शाळेच्या संघाकडून खेळले आणि नंतर भारताचे एकत्र प्रतिनिधित्व केले.