ऑस्ट्रेलिया बुशफायर रिलीफ क्रिकेट बॅशसाठी सचिन तेंडुलकर, कर्टनी वॉल्श सज्ज; मास्टर-ब्लास्टर दिसणार नवीन भूमिकेत
सचिन तेंडुलकर, कर्टनी वॉल्श (Photo Credit: Getty)

शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या बुशफायरने (Australia Bushfire) प्रभावित झालेल्या ग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यासाठी भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वेस्ट इंडीजचे महान कर्टनी वॉल्श (Courtney Walsh) सज्ज आहे. मात्र, दोनघे दिग्गज यंदा बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळताना नाही तर एका वेगळ्याच भूमिकेत दिसतील. सचिन आणि वॉल्श अनुक्रमे पॉन्टिंग इलेव्हन (Ponting XI) आणि वॉर्न इलेव्हनच्या (Warne XI) प्रशिक्षकाची भूमिका बजावतील. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंग आणि अनुभवी फिरकी गोलंदाज वॉर्नने ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या पीडित माणूस आणि जनावरांच्या मदतीसाठी सामना आयोजित केला आहे. या सामन्याने मिळविलेली कमाई पीडितांवर खर्च केली जाईल. या सामन्याचे नाव "बुशफायर रिलीफ मॅच" असेल. स्वयंसेवक, अग्निशमन दलाच्या आणि आपत्कालीन सेवांच्या सुरु असलेल्या आणि अविश्वसनीय कार्याचा विचार करून, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कॉमनवेल्थ बँक महिला तिरंगी मालिका टी-20, त्यानंतर बुशफायर क्रिकेट बॅश आणि केएफसी बिग बॅश फायनल असे तीन सामने खेळले जातील.

पॉन्टिंग, वॉर्न, जस्टीन लँगर, अ‍ॅडम गिलक्रिस्ट, ब्रेट ली, शेन वॉटसन, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल आणि मायकेल क्लार्क यांच्या दिग्गज कलागुणांना तेंडुलकर आणि वॉल्श प्रशिक्षण देताना दिसतील. पुढील पंधरवड्यात आणखी खेळाडू जाहीर होणार आहेत. या सामन्यातून कमावलेला सर्व निधी ऑस्ट्रेलियन रेडक्रॉस आपत्ती निवारण आणि पुनर्प्राप्ती निधीकडे दिला जाईल.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली आग रहिवाशी क्षेत्रात पसरली, ज्याने हजारो कुटुंब बेघर झेले. आगीमुळे सुमारे 23 हजार चौरस मैलांवरील झाडे जळून खाक झाली आहेत. यापूर्वी, टेनिस जगतातील अनेक दिग्गज खेळाडू मददतीसाठी सरसावले होते. सेरेना विल्यम्स, नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नडाल यांसारखे दिग्गज 'रॅली फॉर रिलीफ' टेनिस सामन्यात सहभाग घेतला होता. या टेनिस सामन्यात कमावलेली धनराशी पंडितांच्या मदतीसाठी दान करण्यात आली होती.