
महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) चा 13 वा सामना आज म्हणजेच 15 मार्च रोजी यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB vs UP) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात आरसीबी संघ पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. स्मृती मंधानाचा (Smriti Mandhana) संघ महिला आयपीएल 2023 मध्ये सलग 5 सामने हरला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. दुसरीकडे, यूपी वॉरियर्सची कामगिरी थोडी चांगली झाली आहे. अॅलिसा हिलीच्या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत ज्यात दोन जिंकले आहेत आणि दोन पराभूत झाले आहेत. आजच्या सामन्यात आरसीबीचा संघ पराभूत झाला तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महिला संघांमधील सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या महिला संघांमध्ये खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता नाणेफेक होईल. (हे देखील वाचा: WPL 2023 Points Table: मुंबई इंडियन्सने गुजरातचा 55 धावांनी केला पराभव, प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला)
कुठे पाहणार सामना?
Viacom-18 ने महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. अशा परिस्थितीत सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम-18 च्या स्पोर्ट्स चॅनेल 'स्पोर्ट्स-18 1', 'स्पोर्ट्स-18 1एचडी' आणि 'स्पोर्ट्स-18 खेल' या वाहिन्यांवर केले जाईल. चाहत्यांना Jio Cinema अॅपवर या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहता येणार आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
यूपी वॉरियर्स: अॅलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.
आरसीबी: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, हीदर नाइट, दिशा कसाट, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, आशा शोभना, प्रीती बोस, मेगन शुट, रेणुका ठाकूर.