कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना (IND vs SL 3rd ODI) बुधवारी (7 ऑगस्ट) कोलंबोतील आर प्रेमदासा (R.Premadasa Stadium, Colombo) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याआधी, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात दुखापतींशी झगडत असलेल्या श्रीलंकेच्या संघाने शानदार कामगिरी करत भारतीय संघाचा पराभव केला. भारतीय फलंदाज सलग दुसऱ्या सामन्यात धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. भारतीय संघ सलग दोन सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करू शकला नाही आणि सर्वबाद झाला. (हे देखील वाचा: IND vs SL 3rd ODI Live Streaming: अंतिम सामना गाजणार, भारत-श्रीलंका थोड्याच वेळात भिडणार; येथे पाहू शकता लाइव्ह मॅच)
1997 मध्ये शेवटची वनडे मालिका गमावली
1997 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला शेवटचा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील संघाने तीनही सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरच्या भारतीय संघाचा पराभव केला. तेव्हापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात 11 एकदिवसीय मालिका झाल्या आणि त्या सर्व मालिकांमध्ये भारतीय संघ विजयी झाला. भारताला सध्याची मालिका जिंकता येणार नाही, कारण पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता मालिकेत बरोबरी साधण्यावर भारताचे लक्ष लागले आहे. जर भारताने आजचा सामना जिंकला तर श्रीलंकेविरुद्ध विजयी शतक करणारा तो जगातील एकमेव देश बनेल.
A do or die clash for the #MenInBlue 🔥
Can Sri Lanka end their long drought and clinch an ODI series win against #TeamIndia? 💪
Watch #SLvIND 3️⃣rd ODI LIVE on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/BLwu4QkfzQ
— Sony LIV (@SonyLIV) August 6, 2024
हेड टू हेड आकडेवारीवर नजर
आत्तापर्यंत टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात एकूण 170 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 99 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 58 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामने टाय झाले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. मागील 7 वनडे सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने 6 सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आहे. तर श्रीलंकेचा संघ फक्त एकदाच विजय नोंदवू शकला आहे.
दोघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.