SL vs NZ 2019: श्रीलंकाविरुद्ध टी-20 साठी टिम साऊथी करणार न्यूझीलंडचे नेतृत्व; केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट यांना डच्चू
न्यूझीलंड संघ (Photo by Phil Walter/Getty Images)

केन विल्यमसन (Kane Williamson) आणि ट्रेंट बोल्ट (Trent Boult) यांना 1 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या श्रीलंके (Sri Lanka) विरूद्ध तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडच्या (New Zealand) 14-सदस्यांच्या संघात स्थान मिळाले नाही. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार विल्यमसन आणि वेगवान गोलंदाज बोल्ट पूर्व नियोजित विश्रांतीसाठी मायदेशी परततील. दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंका 1-0 ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी वेगवान गोलंदाज टिम साउथी (Tim Southee) संघाचे नेतृत्व करेल. या संघात ईश सोढी, मिशेल सॅटनर आणि टोड एस्टल या तीन फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषसकमध्ये प्रभावी कामगिरीनंतर न्यूझीलंड संघ आपले संपूर्ण लक्ष आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी-20 विश्वचषकवर केंद्रित करेल. आणि त्याआधी ब्लॅककॅप्स नऊ टी-20 मालिका खेळणार आहेत. श्रीलंकाविरुद्ध मालिका किवी संघासाठी आव्हानात्मक असणार आहे कारण त्यांना स्वत:च्या मूलभूत परिस्थितीत पराभूत करणे कठीण आहे.

असा आहे श्रीलंकाविरुद्ध न्यूझीलंडचा टी-20 संघ:

टिम साऊथी (कॅप्टन), टोड एस्टल, टॉम ब्रुस, कोलिन डी ग्रैंडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टिल, स्कॉट कुग्गेलैन, डॅरेल मिशेल, कॉलिन मुनरो, सेठ रन्स, मिशेल सॅटनर,टिम सेफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी आणि रॉस टेलर.