Cheteshwar Pujara (Photo Credit - Twitter)

यावर्षी टीम इंडिया 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात दोन्ही संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे आणि टी-20 इंटरनॅशनल प्रमाणे टीम इंडिया या वर्षातील पहिली टेस्ट सीरीज भारतात खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या (Nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाईल. गेल्या 10 वर्षात देशांतर्गत कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे आकडे खूपच प्रभावी आहेत. या मालिकेत टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारावर (Cheteshwar Pujara) खूप अवलंबून असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत चेतेश्वर पुजारा शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत एकूण 2 द्विशतके झळकावली आहेत. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: नागपूर कसोटीपूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य, मालिकेत संघाची असणार 'ही' महत्वाची भूमिका)

या फलंदाजांनी झळकावली आहेत सर्वाधिक द्विशतके 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक द्विशतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकर - 2 द्विशतके

चेतेश्वर पुजारा - 2 द्विशतके

व्हीव्हीएस लक्ष्मण - 2 द्विशतके

चेतेश्वर पुजारा रिकी पाँटिंगचा मोडू शकतो विक्रम 

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये रिकी पाँटिंगचा विक्रम मोडू शकतो. या बॉर्डर-गावसकर मालिकेत चेतेश्वर पुजारा 2 द्विशतके करू शकतो. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत चेतेश्वर पुजारा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होता. मालिकेतील पहिल्या सामन्यात चेतेश्वर पुजाराने 90 आणि 102* धावांची खेळी केली. दुसऱ्या कसोटीत त्याने 24 आणि 6 धावांची खेळी खेळली. चेतेश्वर पुजारा या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज'चा किताबही मिळाला होता.