भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. दोघांमध्ये खेळली जाणारी वनडे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत हा सामना जो जिंकेल तो मालिकेवर कब्जा करेल. या सामन्यात भारतीय संघाला आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला तर चार वर्षांचा मोठा विक्रम मोडीत निघेल. खरं तर, भारतीय संघाने गेल्या चार वर्षांत त्यांच्या देशात एकही द्विपक्षीय वनडे मालिका गमावलेली नाही.
2019 मध्ये शेवटची मालिका गमावली
2019 पासून भारताने मायदेशात एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात वनडे मालिकेत भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर 5 सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 3-2 ने मालिका जिंकली. भारतीय संघाने 2019 पासून घरच्या मैदानावर 8 वनडे द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत आणि त्यापैकी 7 जिंकल्या आहेत आणि 1 अनिर्णित राहिली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd ODI Live Streaming Online: निर्णायक सामन्यात कोण मारणार बाजी? जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)
फलंदाजांना उत्तम खेळ दाखवण्याची गरज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत भारतीय संघाची फलंदाजी काही विशेष ठरली नाही. पहिल्या सामन्यात संघाला मोठ्या कष्टाने 188 धावा करता आल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात संघ 110 धावांवर सर्वबाद झाला होता. अशा परिस्थितीत भारताला हा निर्णायक सामना जिंकायचा असेल तर आपल्या फलंदाजांना चमकदार कामगिरी करून मिचेल स्टार्कला टाळावे लागेल.