भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल. मोबाईल आणि टीव्हीवर तुम्ही घरबसल्या बसून सामना सहज पाहू शकता. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आहे तर ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्ह स्मिथकडे (Steve Smith) आहे. या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने शेवटचा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. हा निर्णायक सामना आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोणाचे आहे वर्चस्व?
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत 145 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने यातील 54 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 81 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 66 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 30 आणि ऑस्ट्रेलियाने 31 सामने जिंकले आहेत. यादरम्यान 5 सामने अनिर्णित राहिले आहेत. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd ODI: विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंगला सोडणार मागे, फक्त कराव्या लागणार एवढ्या धावा)
कधी आणि कुठे पाहणार सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तुम्ही ते डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहू शकता. तसेच, डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका तुम्ही मोबाईलवर पाहू शकता.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघांचे खेळाडू
टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा