Team India WTC 2021-23 Schedule: पुढील कसोटी चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक आऊट, ‘या’ 6 संघांशी भिडणार
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

Team India WTC 2021-23 Schedule: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (Worl Test Championship) पहिल्या सायकल स्पर्धेच्या लीग टप्प्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही भारतीय संघासाठी (Indian Team) अनपेक्षित निकालाने संपुष्टात आला. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची निराशा मागे ठेवून आणि काही दिवसांच्या विश्रांतीनंतर विराट कोहली आणि संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सायकलसाठी तयारीला लागणार आहे. ट्रेंट ब्रिज येथे 4 ऑगस्टपासून इंग्लंड (England) विरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी सामन्यांसह भारतीय संघाचे नवीन चक्र सुरु होईल. इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) मालिका संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग आणि आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) व्यस्त होतील. (Team India: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया बनत आहे नवीन 'Chokers'? पाहा आकडेवारी)

यंदाच्या कसोटी अजिंक्यपदाच्या सायकलमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका ऑस्ट्रेलिया सारख्या संघाशी भिडणार असेल. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये 1-0 अशा विजयानंतर भारतीय संघाला ब्रिटिश संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. कोहली सेनेने 2018 मध्ये 5 सामन्यांच्या मालिकेत प्रशंसनीय कामगिरी बजावली होती पण महत्त्वपूर्ण क्षण जिंकण्यात अपयशी ठरले आणि परिणामी 1-4 असा पराभव पत्करावा लागला. चूक सुधारण्याची आणि ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन्ही देशांत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून कामगिरी करण्याची कोहलीकडे आणखी एक संधी आहे.

पाहा भारतीय संघाचे WTC [2021-2023] वेळापत्रक

4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर, इंग्लंड विरुद्ध भारत (5 कसोटी सामने)

न्यूझीलंडचा भारत दौरा (नोव्हेंबर  2021)

नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडचा पाहुणचार करू शकतात. या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जातील. मात्र या मालिकेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. किवी संघाचा हा दौरा टीम इंडियाला पराभवाचा वचपा भरून काढण्याची संधी मिळेल.

दक्षिण आफ्रिका दौरा (डिसेंबर 2021)

किवी संघाविरुद्ध लढतीनंतर भारत डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (South Africa Tour) रवाना होणार आहे. डिसेंबर-जानेवारी दरम्यान दोन्ही संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.

श्रीलंकेचा भारत दौरा 2022

आयपीएल 2022 च्या काही महिन्यांपूर्वी श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour of India) येईल. या मालिकेत तीन कसोटी आणि तीन टी -20 सामने खेळले जातील.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2020

भारताकडून सलग दोन मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने कांगारू संघ भारत दौऱ्यावर (Australia Tour of India) येईल. 2022 च्या उत्तरार्धात घरच्या मैदानावरील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) स्पर्धेदरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.

भारताचा बांग्लादेश दौरा 2023

'विराटसेने'ची डब्ल्यूटीसी मोहीम बांग्लादेश दौऱ्यावर (India Tour of Bangladesh) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह संपुष्टात येईल. नोव्हेंबरच्या अखेरीस भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाऊ शकतो असे मानले जात आहे.

दरम्यान, 2021 ते 2023 या कालावधीत भारतीय संघ दोन टी-20 वर्ल्ड कप आणि एक वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा देखील खेळणार आहे. यापैकी दोन स्पर्धांचे आयोजन बीसीसीआय करणार आहे तर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे.