COVID-19 मुळे टीम इंडिया श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौर्‍यावर येणार नाही, BCCI ची मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे आज, शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले. भारतीय संघ 24 जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 मालिका खेळणार होता. तर त्यानंतर 22 ऑगस्टपासून नियोजित झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात येत होती, पण आता बीसीसीआयने हे दोन्ही दौरे स्थगित करण्याऐवजी थेट रद्द केले आहेत. "मैदानावर प्रशिक्षण देणे सुरक्षित समजले जाईल तेव्हाच बोर्ड आपल्या करारातील खेळाडूंसाठी शिबिर घेईल," असे बीसीसीआयने पुढे निवेदनात सांगितले. आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेट पुन्हा सुरू करण्याचा संकल्प करीत असतानाही, व्हायरसचा प्रसार होण्यासंबंधी भारत सरकार व इतर यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ शकेल अशा कोणत्याही निर्णयावर ते घाई करणार नाहीत यावर्षी बीसीसीआय भर देत आहेत. (IND vs SL 2020: टीम इंडियाचा श्रीलंका दौरा स्थगित, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घेतला निर्णय)

बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, "बीसीसीआयने 17 मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मैदानातील परिस्थिती क्रिकेटसाठी अनुकूल आणि सुरक्षित असल्यानंतरच वार्षिक कराराअंतर्गत बांधिल असलेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करेल. बीसीसीआय आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार तसेच इतर संबंधित संस्थांनी करोन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धोकादायक ठरणार्‍या कोणताही निर्णय बीसीसीआय घेणार नाही."

गुरुवारी आयसीसीने श्रीलंकेविरुद्धची मालिका पुढे ढकलण्यात आल्याचे म्हण्टल्यावरबीसीसीआयने या दोन्ही दौऱ्याबाबत अधिकृत घोषणा केली. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांच्या जवळ पोहचली आहे. तर आजवर 8 हुन अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.