भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टी-20 (Photo Credits: IANS)

टीम इंडियाचा (India) यंदा जूनमध्ये होणारा श्रीलंका (Sri Lanka) दौरा सध्या सुरू असलेल्या जागतिक कोविड-19 च्या (COVID-19) प्रसारामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. 13 मार्चपासून कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नसल्यामुळे बरीच प्रभावित मालिकांपैकी ही सर्वात ताजी मालिका आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ (Indian Team) तीन टी-20 आणि तितक्याच वनडे मालिका खेळणे अपेक्षित होते. मात्र, आता हा दौरा यावर्षीच नव्याने आयोजित होण्याची बीसीसीसीयला अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोशल मीडियाद्वारे याची घोषणा केली असून, कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे खेळाडूंना श्रीलंका दौरा करणे शक्य नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीलंका क्रिकेटला दिली असल्याचे वृत्त जाहीर केले. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट 8 जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. “जून-जुलैमध्ये हा दौरा पुढे जाणे शक्य नाही आणि आम्ही ते श्रीलंकेच्या बोर्डाला (SLC) कळविले आहे. तथापि, आम्ही मालिकेसाठी वचनबद्ध आहोत (नंतरच्या तारखेला)," बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. (ICC कडून श्रीलंकेच्या 3 खेळाडूंची मॅच-फिक्सिंग प्रकरणी चौकशी, माजी क्रिकेटपटूंचा समावेश असल्याची क्रीडा मंत्रांनी दिली माहिती)

देशातील प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना भारतीय खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू केले नसल्याने दौरा रद्द करण्याची अपेक्षा होती. भारतात आजवर 8,000 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली तर संक्रमितांची संख्या 3 लाखाच्या जवळ पोहचली आहे.

दरम्यान, श्रीलंका टीम वर्षाच्या सुरुवातीला 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली होती. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर यजमान भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घातली. दोन्ही टीममध्ये अखेरची वनडे मालिका श्रीलंका दौऱ्यावर खेळली गेली ज्यात भारताने 2-1 ने विजय मिळवला. आयसीसी वनडे वर्ल्ड कप सामन्यात देखील भारताचे वर्चस्व पाहायला मिळाले. वर्ल्ड कप सामन्यात अँजेलो मॅथ्यूजचे शतक व्यर्थ करत भारताची सलामी जोडी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी शतकी खेळी केली होती.