
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 ची (Border-Gavaskar Trophy 2023) सुरुवात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 9 फेब्रुवारीपासून होत आहे. दोन्ही संघांमधील ही ट्रॉफीची 16 वी आवृत्ती असेल. याआधी भारताने 8 वेळा तर ऑस्ट्रेलियाने 7 वेळा यजमानपद भूषवले आहे. या मालिकेतही भारतीय संघाने कांगारूंवर बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या 18 वर्षात भारतीय भूमीवर फक्त एकच कसोटी सामना जिंकला आहे. 2004-05 पासून 2022-23 पर्यंत, कांगारू संघाला भारतीय भूमीवर फक्त एकच कसोटी सामना जिंकता आला आहे, तर 10 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. हा आकडा खरोखरच मायदेशात टीम इंडियाचे वर्चस्व किती मजबूत आहे हे सांगतो. (हे देखील वाचा: IND vs AUS Test, ODI Series 2023 Schedule: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यांना 9 फेब्रुवारीपासून होणार सुरुवात, बघून घ्या कसोटी आणि वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक)
आणखी एक खास गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा दबदबाही कमी केला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे भारतीय संघाने मागील तीन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्या आहेत. यातील शेवटचे दोन सामने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून जिंकले होते. आणि 2016-17 मध्ये भारताने कांगारूंना त्यांच्याच भूमीवर 2-1 ने पराभूत केले. ऑस्ट्रेलियन संघाने शेवटचे आठ वर्षांपूर्वी 2014-15 मध्ये भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-0 ने हरवून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून तो विजयाची वाट पाहत आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 चे वेळापत्रक
पहिली कसोटी: 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी: 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी: 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी: 9 ते 13 मार्च, अहमदाबाद