भारत विरुद्ध स्कॉटलंड (Photo Credit: Twitter/ICC)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) पहिल्या दोन सामन्यात लज्जास्पद पराभवाला सामोरे गेल्यावर भारतीय संघाने (Indian Team) पुढील दोन सामन्यात विजयासह शानदार पुनरागमन केले आहे. दुबई येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने T20 विश्वचषकातील आपला दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. सुपर 12 टप्प्यातील गट 2 मधील सामन्यात भारताने एकतर्फी सामन्यात स्कॉटलंडचा (Scotland) 8 गडी राखून पराभव केला. हा संघाचा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. या विजयामुळे संघाचा नेट रनरेट गटातील सर्वोत्तम बनला आहे. म्हणजेच, या प्रकरणात संघ आघाडीवर पोहोचला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाने एकूण 4 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्कॉटलंडचा संघ पहिले फलंदाजी करताना केवळ 85 धावा करू शकला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) 6.3 षटकांत दोन गडी राखून लक्ष्य गाठले. आता टीम इंडियाचा सुपर 12 मधील अंतिम लढत 8 नोव्हेंबर रोजी नामिबियाशी होणार आहे. स्कॉटलंडविरुद्ध मोठ्या विजयामुळे संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. (IND vs SCO, ICC T20 WC 2021: बर्थडे बॉय विराट कोहलीला टीम इंडियाची विजयी भेट, स्कॉटलंडला 8 विकेटने लोळवलं; सेमीफायनलची लढत रोमांचक वळणावर!)

गट-2 बद्दल बोलायचे झाले तर जर अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने 7 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडला (New Zealand) हरवले तर टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. कारण नेट रनरेट गटात सर्वोत्तम आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यानंतर टीम इंडियाला  देखील नामिबियाविरुद्ध विजयी लय कायम ठेवणे गरजेचे असेल. UAE च्या रेकॉर्डबद्दल बोलायचे तर अफगाणिस्तानची विजयाची टक्केवारी न्यूझीलंडपेक्षा चांगली आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानचा संघ उलटफेर करू शकतो. पण किवी संघात सर्वात अनुभवी आणि सध्या चांगल्या लयीत आहेत. त्यामुळे मोहम्मद नबीच्या अफगाणिस्तान संघाला विजय मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकते.

टीम इंडियाला 14 वर्षांपासून टी-20 विश्वचषक जिंकता आलेले नाही. अशा स्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला सध्या अनपेक्षित असा विजय कारनामा करायला नक्कीच आवडत. मात्र पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावानंतर संघाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा संघ गटातून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारत, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.