आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या आपल्या तिसऱ्या सुपर-12 सामन्यात टीम इंडियाने (Team India) स्कॉटलंडला (Scotland) 8 विकेटने लोळवलं आणि कर्णधार व बर्थडे बॉय विराट कोहलीला (Virat Kohli) विजयाची भेट दिली. टी-20 वर्ल्ड कपमधील चौथ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. आणि दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघाने (Indian Team) स्कॉटलंड संघाला अवघ्या 85 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात विराट ब्रिगेडने षटकात दोन विकेट गमावून विजयीरेष ओलांडली. रोहित शर्माने 16 चेंडूत 30 तर केएल राहुलने (KL Rahul) 19 चेंडूत 50 धावा केल्या. यापूर्वी मोहम्मद शमी-जसप्रीत बुमराहची वेगवान आणि रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) फिरकीने स्कॉटिश फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. परिणामी स्कॉटिश संघ अवघ्या 17.4 षटकांत गारद झाला. स्कॉटलंडच्या 7 फलंदाजांना दहाचा टप्पाही पार करू शकले नाही. टीम इंडियाकडून जडेजा आणि मोहम्मद शमीने 15 धावा देत प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. (T20 World Cup 2021: विश्वचषकात ‘शानदार शनिवारी’मध्ये चार संघात रंगणार चुरशीची लढत, एकाच दिवशी मिळणार आणखी दोन Semifinalist संघ)
दरम्यान, स्कॉटलंडविरुद्ध सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं आणि झालं देखील तसेच. गोलंदाजांनंतर रोहित-राहुलच्या सलामी जोडीच्या जबरा खेळीच्या जोरावर भारताने चेंडूतच लक्ष्य गाठलं. दरम्यान आजचा सामना भारतीय संघासाठीच नव्हे तर कर्णधार विराट कोहलीसाठी देखील खास होता. विराट कोहली आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच दिवशी यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर कोहलीला टॉस जिंकण्यात यश मिळालं. स्कॉटलंडविरुद्ध सामन्यात विराटने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. उल्लेखनीय आहे की विश्वचषकच्या पहिल्या तिन्ही सामन्यात टीम इंडियाला टॉस हरल्यानंतर पहिले फलंदाजी करावी लागली होती. यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने भारताने गमावले, तर अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 66 धावांनी दणदणीत विजय झाला. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये भारताने पहिल्यांदा 10 विकेटने सामना खिशात घातला आहे.
दुसरीकडे, आजच्या सामन्यात धमाकेदार विजयासह गट 2 मधील सेमीफायनलची रेस अजून रंजक बनली आहे. पाकिस्तान यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे तर अखेरच्या दुसऱ्या जागेसाठी तीन संघात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. न्यूझीलंड सध्या सहा पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर नेट-रनरेटने अफगाणिस्तानला मागे टाकून भारत गुणतालिकेत चार गुण घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.