रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सांगितले की, त्याचे सहकारी आणि प्रशिक्षक कर्मचारी उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या त्यांच्या संधी संबंधित कशाचीही चर्चा करत नाहीत आणि त्यांचे सर्व लक्ष आयसीसी टी-20 विश्वचषकातील शेवटचे दोन सुपर 12 सामने जिंकण्यावर आहे. अफगाणिस्तानला (Afghanistan) 66 धावांनी पराभूत केल्यानंतर बुधवारी रात्री भारताने सुपर 12 मध्ये पहिला विजय नोंदवला परंतु पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून (New Zealand) झालेल्या मोठ्या पराभवानंतर ते स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला आता त्यांचे उर्वरित सामने नामिबिया (Namibia) आणि स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज आहे आणि त्यानंतर शेवटच्या चारमध्ये जाण्यासाठी त्यांना अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडविरुद्ध विजयाची आस आहे. (T20 World Cup 2021: स्कॉटलंड कर्णधार विराट कोहलीवर फिदा, म्हणाला- ‘सामन्यानंतर आमच्या ड्रेसिंग रूममध्ये...’)

या दरम्यान अश्विनने दुबईत स्कॉटलंडविरुद्ध गट 2 च्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांना गंमतीने सांगितले की भारताने मुजीब उर रहमानला फिजिओ सपोर्ट देऊ शकला असता तर तो अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी तंदुरुस्त झाला असता. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताचे भवितव्य अवलंबून असेल. अफगाणिस्तान फिरकीपटू दुखापतीतून सावरत असल्याने शेवटचे दोन सामने खेळू शकला नाहीत. स्पर्धेत एकामागोमाग पराभवाचा सामना केल्यानंतर भारताने अखेरीस मोहम्मद नबीच्या संघावर विजय मिळवला. तथापि, भारताने त्यांचे उर्वरित सर्व दोन सामने जिंकले तरी ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची खात्री नाही. त्यांचे भवितव्य मुख्यत्वे गट 2 मधील इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे. भारताला पुढे जाण्यासाठी अफगाणिस्तान किंवा नामिबिया यापैकी एकाला न्यूझीलंडचा पराभव करावा लागेल.

“हा एक मजेदार खेळ आहे आणि अफगाणिस्तानने चांगले क्रिकेट खेळले आहे आणि आमच्या अनेक आशा त्यांच्यावर आहेत, त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा. मला खरोखर इच्छा आहे की आम्ही मुजीबला फिजिओ सपोर्ट देऊ शकलो तर आम्ही त्याला मैदानावर आणू शकू. आम्ही एवढीच आशा करू शकतो,” अश्विनने पत्रकार परिषदेत म्हटले.