New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 1st T20I Match Live Streaming: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (NZ vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (T20I Series) पहिला सामना आज म्हणजेच 28 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. न्यूझीलंड संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना मजबूत दिसत आहे, तर श्रीलंकेच्या संघाला वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड (NZ vs SL Head to Head Record)
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात न्यूझीलंड संघाचे पारडे जड झाले आहे. न्यूझीलंड संघाने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेच्या संघाने केवळ 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघाने सहा सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्याच वेळी, 1 सामना बरोबरीत आहे.
2️⃣ Powerhouses of #Cricket, 1️⃣ Epic T20I series 🤩
Expect stunning catches, explosive sixes & game-changing spells in the 1️⃣st #NZvSL T20I, starting 28th December - LIVE on #SonyLIV 📲 pic.twitter.com/eEijkGihqf
— Sony LIV (@SonyLIV) December 27, 2024
भारतात कुठे पाहणार सामना?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. याशिवाय, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल हे (विकेटकीपर), टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेकब डफी, मॅट हेन्री, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, झाकरी फौल्केस.
श्रीलंका : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, असिथा फर्नांडो, महिश थेक्षाना, मतिशा पाथिराना, नुवान थुशारा.