Krunal Pandya (Photo Credits: ANI)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: अखेर 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेसह भारताच्या घरगुती हंगामची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 38 संघ सहभागी होत आहेत, त्यापैकी बडोदा अनेक वर्षांपासून या स्पर्धेत सातत्याने भाग घेत आहे. बडोदा (Baroda) एलिट सी अगटात असून रविवारी उत्तराखंडशी त्यांचा सामना होणार आहे. तथापि, हंगामाच्या पहिल्या सामन्याच्या 24 तास आधी बडोद्याची टीम वादात अडकली आहे. बडोद्याच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या दीपक हुडाने (Deepak Hooda) अखेरच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतली आहे. बरोडा संघाचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya) याच्याशी झालेल्या वादानंतर उपकर्णधार दीपकने हा निर्णय घेतला. रविवारी सामन्यापूर्वी बरोडाच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना क्रुणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाले. दीपकने बीसीसीआयला (BCCI) एक ईमेल लिहून लिहिले की, कृणाल पांड्याने त्याच्याबरोबर शिवीगाळ केली आहे. तसेच आगामी टी-20 स्पर्धेतही तो खेळणार नाही असेही त्याने लिहिले. (Sreesanth Comeback: जुन्या श्रीसंतचे मैदानावर कमबॅक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सराव सामन्यात केली स्लेजिंग Watch Video)

क्रुणालने वादादरम्यान दीपकला धमकी दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. न्यूज रिपोर्टनुसार, दीपक प्रशिक्षकाच्या परवानगीनेच सराव करीत असतानाअष्टपैलू पांड्याने त्याला त्याला धमकावण्यास सुरूवात केली असल्याचेही दीपकने आपल्या ई-मेलमध्ये लिहिले. हूडाने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. दीपक हूडा बडोद्याचा एक अनुभवी खेळाडू आहे. बडोद्यासाठी हूडाने 46 प्रथम श्रेणी सामने, 68 लिस्ट-ए सामने आणि 123 टी-20 सामने खेळले आहेत. यावेळी बरोडा संघात युसुफ पठाणही नसल्यामुळे हूडाच्या स्पर्धेतून माघार घेणे हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संघ आणि गट

एलिट ग्रुप अ: जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, रेल्वे, त्रिपुरा (ठिकाण: बेंगलोर)

एलिट ग्रुप बी: ओडिशा, बंगाल, झारखंड, तामिळनाडू, आसाम, हैदराबाद (ठिकाण: कोलकाता)

एलिट ग्रुप सी: गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, बडोदा, उत्तराखंड (ठिकाण: वडोदरा)

एलिट ग्रुप डी: सेना, सौराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा (ठिकाण: इंदोर)

एलिट ग्रुप ई: हरियाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, मुंबई, केरळ, पुडुचेरी (ठिकाण: मुंबई)

प्लेट गट: चंडीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश (ठिकाण: चेन्नई).