England Vs Pakistan Test Series: पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज यासिर शाहविरूद्ध (Yasir Shah) अयोग्य भाषा वापरल्यामुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडवर (Stuart Broad) मॅच रेफरी आणि त्याचे वडील क्रिस ब्रॉड (Chris Broad) यांनी सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावला. ही घटना पाकिस्तानच्या दुसर्या डावातील 46 व्या षटकातील आहे जेव्हा ब्रॉडने शाहला बाद केल्यानंतर अनुचित भाषेचा वापर केला. इंग्लंड (England)-पाकिस्तानमधील (Pakistan) मॅचचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ही घटना घडली. ब्रॉडने आपली चूक मान्य केल्याने औपचारिक सुनावणीची आवश्यकता पडली नाही. आयसीसीच्या आचारसंहितेमध्ये ब्रॉडविरुद्ध एक डिमेरिट पॉईंट देखील जोडला गेला आहे. 'भाषा, कृती किंवा जेश्चर' वापरुन एखाद्या खेळाडूला बाद होण्यापासून भडकावणाऱ्या 'भाषा, कृती किंवा हावभाव' वापरण्याशी संबंधित असलेल्या आयसीसीच्या प्लेअर आणि सपोर्ट स्टाफच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल ब्रॉड दोषी आढळला. आपल्या वडिलांकडून दंड ठोठावण्यात आल्यानंतर ब्रॉडने ट्विट करून मजेदार प्रतिक्रिया दिली. (Stuart Broad Fined: आयसीसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला दंड)
वडिलांकडून मुलाला दंड देण्याची क्रिकेटच्या इतिहासातील ही एक अनोखी घटना होती. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ब्रॉडचे वडील क्रिस ब्रॉड हे रेफरी होते. अशा परिस्थितीत ब्रॉड सिनिअरने आयसीसीच्या वतीने मुलगा स्टुअर्टला चुकांबद्दल शिक्षा दिली आहे. नुकत्याच 500 कसोटी विकेट क्लबमध्ये सामील झालेल्या स्टुअर्टने या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विट केले. ब्रॉडच्या अनुशासन रेकॉर्डमध्ये एक डिमरेट पॉईंट जोडला गेला. 24 महिन्यांतील हा त्याचा तिसरा गुन्हा आहे आणि एकूण डिमॅरिट पॉईंट्स वाढवून तीन करण्यात आले आहेत.
He’s off the Christmas card & present list
— Stuart Broad (@StuartBroad8) August 11, 2020
ब्रॉडचे वडील क्रिसबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 25 कसोटी सामने खेळले आणि 1661 धावा केल्या. ब्रॉड सिनिअर आपल्या मुलासारखे गोलंदाज नसून फलंदाज होते. दरम्यान, पहिल्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला 3 गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेचा दुसरा कसोटी सामना 13 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये 3 कसोटी सामन्यानंतर 3 टी-20 सामने देखील खेळले जातील.