WTC Points Table 2023-25: बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेच्या विजयामुळे कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल, पाकिस्तानचे नुकसान
SL Team (Photo Credit - X)

WTC Points Table 2023-25: श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवारी संपली. यजमानांविरुद्ध 2-0 असा विजय मिळवत श्रीलंकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table 2023-25) मोठा बदल केला. यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे, तर भारताच्या गुणतालिकेत कोणताही परिणाम झाला नाही. श्रीलंकेने दुसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी 192 धावांनी जिंकला. याआधी संघाने पहिला सामना 328 धावांनी जिंकला होता. (हे देखील वाचा: KKR vs DC, IPL 2024 Match 16th Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज होणार लढत, एक क्लिकवर येथे पाहा सामना)

क्रं  संघ सामने विजय पराभव ड्रॉ गुण गुणांची टक्केवारी
1 भारत 9 6 2 1 74 68.51
2 ऑस्ट्रेलिया 12 8 3 1 90 62.50
3 न्युझीलँड 6 3 3 0 36 50.00
4 श्रीलंका 4 2 2 0 24 50.00
5 पाकिस्तान 5 2 3 0 22 36.66
6 वेस्टइंडीज 4 1 2 1 16 33.33
7 दक्षिण आफ्रिका 4 1 3 0 12 25.00
8 बांग्लादेश 4 1 3 0 12 25.00
9 इंग्लंड 10 3 6 1 21 17.50

श्रीलंकेला फायदा, तर पाकिस्तानचे नुकसान 

या विजयासह श्रीलंका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी संघ 33.33 गुणांसह सहाव्या क्रमांकावर होता. दुसऱ्या सामन्यातील विजयासह संघाने पाकिस्तानला मागे सोडले. श्रीलंकेची गुणांची टक्केवारी 50 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, पाकिस्तान 36.66 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंकेने चारपैकी दोन सामने जिंकले. त्याचवेळी पाकिस्तानने पाच सामने खेळले ज्यात दोन जिंकले.

भारत आहे अव्वल 

श्रीलंकेच्या विजयामुळे भारताचे कोणतेही नुकसान झालेले नाही. नऊ सामन्यांत सहा विजयांसह भारत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाच्या गुणांची टक्केवारी 68.51 आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे ज्याची गुणांची टक्केवारी 62.50 आहे. त्याच वेळी, न्यूझीलंड सहा सामन्यांमध्ये तीन विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याची गुणांची टक्केवारी 50 आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी 25 आहे.