Sri Lanka National Cricket Team vs West Indies Cricket Team 2nd ODI 2024: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला. अशा स्थितीत पाहुण्या संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करून मालिका 2-0 ने जिंकण्याडचे श्रीलंकेचे लक्ष असेल. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा संघ आजचा सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्या हाती असेल. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व शाई होपकडे आहे.
हेड टू हेड आकडेवारी
श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ आतापर्यंत 66 वेळा एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये श्रीलंकेने 32 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिज 31 सामने जिंकण्यात भाग्यवान आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. अशा स्थितीत एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याचे हेड टू हेड रेकॉर्डवरून स्पष्ट होत आहे. कोणत्या संघाचा वरचष्मा आहे हे सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र, सध्या श्रीलंकेचा संघ घरच्या परिस्थितीत बलाढ्य मानला जात आहे.
खेळपट्टीचा अहवाल
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटू आणि संथ गोलंदाजांना खूप मदत मिळते. या खेळपट्टीवर डावाच्या सुरुवातीला फलंदाजांना नवीन चेंडूने धावा काढणे सोपे जाईल, पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा चेंडू उसळू लागेल. दुसऱ्या डावात फिरकीपटूंना बऱ्यापैकी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील प्रमुख खेळाडू (Key Players): चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, ड्युनिथ वेल्स, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, शाई होप, एविन लुईस, ब्रँडन किंग, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो हे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग कसा बदलायचा हे माहित आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. (हे देखील वाचा: SL vs WI 2nd ODI 2024 Live Streaming: श्रीलंकेला आज वनडे मालिका जिंकण्याची संधी, तर वेस्ट इंडिजचे लक्ष असेल पुनरागमनाकडे; येथे जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद)
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (Mini Battle): वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होप आणि महेश थेक्षाना यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. मात्र, दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत आहे. जे गोलंदाजांसाठी मोठे आव्हान असेल. याशिवाय दोन्ही संघांची फळी संतुलित आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार 02:30 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.
कुठे पाहणार सामना?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेचे प्रसारण हक्क आहेत. त्याचप्रमाणे, श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रवाह फॅनकोड ॲप, सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. फॅनकोडवर, तुम्हाला 25 रुपयांमध्ये मॅच पास आणि 99 रुपयांमध्ये तीनही सामन्यांसाठी टूर पास मिळू शकतो. याशिवाय सोनी लिव्हवर सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शनही आवश्यक आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंका संघ : कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालेज, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशांका, जेठ मदुशंका, जेष्ठ निसांका लियानागे, मोहम्मद शिराज, चामिंडू विक्रमसिंघे
वेस्ट इंडिजचा संघ : शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), एविन लुईस, ब्रँडन किंग, ॲलेक अथेनेस, केसी कार्टी, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, मॅथ्यू फोर्ड, जेडन सीफ, जेडन सी, शेरफेन , ज्वेल अँड्र्यू