Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd ODI Match 2024 Scorecard: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार होता. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले (Pallekele) येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium) होणार होता. तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाने मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत श्रीलंकेची कमान चरित असलंकाच्या (Charith Asalanka) हाती होती. त्याच वेळी न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनर (Mitchell Santner) करत होते. (हेही वाचा - Sri Lanka vs New Zealand 3rd ODI Toss Update: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय; श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाखवावी लागणार चांगली कामगिरी)
पाहा पोस्ट -
The third ODI in Pallekele has been called off due to rain... 😢
Sri Lanka take the series 2-0 👏 | #SLvNZ pic.twitter.com/F5SNKdLF1Q
— Cricbuzz (@cricbuzz) November 19, 2024
दरम्यान, तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 24 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. यानंतर विल यंग आणि हेन्री निकोल्स यांनी मिळून न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली. 21वे षटक संपल्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यामुळे सामना मध्यंतरी थांबवावा लागला. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर सामना रद्द करण्यात आला. यासह श्रीलंकेने मालिकेवर कब्जा केला, तर न्यूझीलंड संघाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. संघाची शीर्ष फळी मजबूत दिसत आहे, यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने डाव सांभाळला आणि सामना जिंकणारा डाव खेळला. गोलंदाजीत महेश थेक्षाना आणि जेफ्री वँडरसे यांनी घातक गोलंदाजी केली. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. त्याची फलंदाजी ही फिरकी गोलंदाजीसमोरील कमकुवत दुवा ठरली आहे. मात्र, मार्क चॅपमन आणि मिचेल हेसारख्या फलंदाजांनी काही प्रमाणात धावा केल्या आहेत.