Sri Lanka National Cricket Team vs West Indies Cricket Team 2nd ODI 2024: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला. अशा स्थितीत पाहुण्या संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करून मालिका 2-0 ने जिंकण्याडचे श्रीलंकेचे लक्ष असेल. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा संघ आजचा सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्या हाती असेल. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व शाई होपकडे आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेचे प्रसारण हक्क आहेत. जे सोनी स्पोर्ट्स टेन 5 टीव्ही चॅनलवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे प्रसारण प्रदान करेल. त्याचप्रमाणे, श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रवाह फॅनकोड ॲप, सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. फॅनकोडवर, तुम्हाला 25 रुपयांमध्ये मॅच पास आणि 99 रुपयांमध्ये तीनही सामन्यांसाठी टूर पास मिळू शकतो. याशिवाय सोनी लिव्हवर सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शनही आवश्यक आहे.
A true captain's showing from Asalanka that gave Sri Lanka a 1-0 lead against West Indies 🫡
Watch the crucial #SLvWI 2️⃣nd ODI LIVE on #SonyLIV 📲 pic.twitter.com/F2ZK0d0XsT
— Sony LIV (@SonyLIV) October 22, 2024
दोन्ही देशाचे खेळाडू
श्रीलंकेचा संघ : कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालेज, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशांका, जेठ मदुशंका, जेष्ठ निसांका लियानागे, मोहम्मद शिराज, चामिंडू विक्रमसिंघे
वेस्ट इंडिजचा संघ : शाई होप (कर्णधार आणि यष्टिरक्षक), एविन लुईस, ब्रँडन किंग, ॲलेक अथेनेस, केसी कार्टी, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, मॅथ्यू फोर्ड, जेडन सीफ, जेडन सी, शेरफेन , ज्वेल अँड्र्यू