![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/07/SL-Team-4.jpg?width=380&height=214)
Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी पराभव केला. यासह, श्रीलंकेने मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेत श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्याकडे होती. तर, ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे होते. (हे देखील वाचा: मोफत स्ट्रीमिंग होणार बंद? JioHotstar चे नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती)
A dominant performance from Sri Lanka to clinch a 2-0 series win - it's their biggest win (by runs) against Australia in ODIs 🙌 https://t.co/Sky7hCp1aE | #SLvAUS pic.twitter.com/phoA3ENnfN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 14, 2025
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 15 धावांवर बसला. यानंतर, निशान मदुष्का आणि कुसल मेंडिस यांनी मिळून डावाची सूत्रे हाती घेतली आणि संघाचा धावसंख्या 100 च्या पुढे नेली.
श्रीलंकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत चार गडी गमावून 281 धावा केल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, कुसल मेंडिसने 115 चेंडूत 11 चौकार मारले. कुसल मेंडिस व्यतिरिक्त कर्णधार चारिथ असलंकाने नाबाद 78 धावा केल्या.
दुसरीकडे, अॅरॉन हार्डीने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइस, आरोन हार्डी, शॉन अॅबॉट आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकांत 282 धावा कराव्या लागल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही निराशाजनक झाली कारण तीन फलंदाज केवळ 33 धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 24.2 षटकांत फक्त 107 धावांवर ऑलआउट झाला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने 29 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, स्टीव्ह स्मिथने 34 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारला. स्टीव्ह स्मिथ व्यतिरिक्त जोश इंगलिसने 22 धावा केल्या.
त्याच वेळी, असिता फर्नांडोने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून ड्युनिथ वेल्सने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. डुनिथ वेलेझ व्यतिरिक्त, असिता फर्नांडो आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.