केएल राहुल आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

SRH vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या मोसमातील 22वा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात सनरायजर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत अद्यापही दोन्ही संघांची अवस्था अत्यंत खराब आहे. किंग्ज इलेव्हन अवघ्या एका विजयासह गुणतालिकेत अंतिम स्थानावर आहे आणि सनरायझर्स दोन विजयांसह सहाव्या स्थानी आहे. मागील सामन्यात दोन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे विजयी मार्गावर परतणे दोघांनाही फार महत्वाचे आहे. त्यामुळे, दोन्ही संघांनी आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहे. (SRH vs KXIP, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

हैदराबादने आजच्या सामन्यासाठी सिद्धार्थ कौलला बाहेरचा रास्ता दाखवला असून त्याच्या जागी खालील अहमदला संधी दिली आहे. तर किंग्स इलेव्हनने तीन बदल केले आहेत. क्रिस जॉर्डन, हरप्रीत ब्रार आणि सरफराज खान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाले असून त्यांच्या जागी पंजाबने मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंह आणि प्रभसिमरन सिंह यांना संधी दिली आहे. हैदराबादकडून वॉर्नर आणि बेअरस्टोची जोडी डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या स्थानावर मनीष पांडे, चौथ्यावर केन विल्यमसन आणि पाचव्यावर युवा प्रियम गर्ग फलंदाजी करतील. मागील सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. भुवनेश्वर कुमार स्पर्धेतून बाहेर पडला आहे ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या अडचणीत वाढ झाली आहे. पण, टीममध्ये अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल आणि टी नटराजन असे गोलंदाज आहेत. दुसरीकडे, पंजाबची गोलंदाजी कमजोर आहे. मोहम्मद शमीला वगळता अन्य कोणताही फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. पंजाबची ताकद त्यांची सलामी जोडी आहे. राहुल आणि मयंक अग्रवालच्या जोडीने आजवर आयपीएल गाजवले आहे.

पाहा हैदराबाद आणि पंजाबचा प्लेइंग इलेव्हन

सनरायजर्स हैदराबादः डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, खालील अहमद आणि टी नटराजन.

किंग्स इलेव्हन पंजाबः केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि शेल्डन कोटरेल.