South Africa Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team, 2024 ICC Women's T20 World Cup Final: 2024च्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 साठी अंतिम सामना आज होत आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. आजच्या फायनलची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांनी अद्याप एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा स्थितीत कोणताही संघ विजेतेपद मिळवेल. त्यामुळे विश्वचषकात इतिहास बदलणार हे नक्की असणार आहे. दरम्यान या सामन्यात आज साउथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्रररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - South Africa Women vs New Zealand Women, Final Match Stats And Record Preview: महिला विश्वचषक टी 20 च्या जेतेपदासाठी वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची स्पर्धा; आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम )
पाहा पोस्ट -
🇿🇦 South Africa vs New Zealand 🇳🇿 - Final
TOSS: SA, BOWL
Both sides are unchanged#T20WorldCup | #SAvNZ pic.twitter.com/WsM6n61Ukg
— Women’s CricZone (@WomensCricZone) October 20, 2024
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिझान कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनी डर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.
न्यूझीलंड: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.