South Africa Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team, 2024 ICC Women's T20 World Cup Final: 2024च्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 साठी अंतिम सामना आज होत आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. आजच्या फायनलची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांनी अद्याप एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा स्थितीत कोणताही संघ विजेतेपद मिळवेल. त्यामुळे विश्वचषकात इतिहास बदलणार हे नक्की. सध्याच्या आयसीसी टी20 विश्वचषकात दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. तर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला.
या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका केवळ एका पराभवाने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कर्णधार लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद केली. अनेके बॉश आणि मारिझान कॅप हे दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख फलंदाज आहेत, तर गोलंदाजीमध्ये अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत.
हेड टू हेड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 11 सामने जिंकले आहेत. तर एकाही सामन्याचा निकाल लागला नाही. आकडेवारी पाहता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंड संघाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट होते.
हे मोठे विक्रम आजच्या सामन्यात होऊ शकतात
- दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 45 धावांची गरज आहे.
- दक्षिण आफ्रिकेची स्टार गोलंदाज नॉनकुलुलेको म्लाबाला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण करण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेची दिग्गज अष्टपैलू खेळाडू मॅरिझान कॅपला 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 13 धावांची गरज आहे.
- न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनला T20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 43 धावांची गरज आहे.
- न्यूझीलंडची दिग्गज गोलंदाज लेग कास्परेकला टी-20 क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण करण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज लेग कास्परेकला 150 बळी पूर्ण करण्यासाठी फक्त चार विकेट्सची गरज आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, क्लो ट्रायन, सून लुस, नादिन डी क्लर्क, अनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.
न्यूझीलंड: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, एडन कार्सन, फ्रॅन जोनास.