PC-X

ISSF World Cup: भारतीय नेमबाज सिमरनप्रीत कौर ब्रारने (Simranpreet Kaur) आज सोमवारी झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. हे तिचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक आहे. तर पॅरिस ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकर हीला चौथे स्थानावर समाधान मानावे लागले आहे. भारताच्या 20 वर्षीय सिमरप्रीतने 10 रॅपिड फायर मालिकेत 33 हिट्स मारल्या आणि ती चीनच्या सुन युजीपेक्षा फक्त एक शॉट मागे होती. सुन युजीने या स्पर्धेत सलग दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे. तर चिनचा आणखी एक नेमबाज याओ कियानशूनने 29 हिट्ससह कांस्यपदक जिंकले आहेत.Ajinkya Rahane Record: अजिंक्य रहाणे, विराट-वॉर्नर यांच्या क्लबमध्ये दाखल; आयपीएलमध्ये रचला 500 चौकारांचा मोठा विक्रम

या स्पर्धेत भारताचे हे चौथे रौप्यपदक आहे. याशिवाय भारताने दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदकही जिंकले आहे. अर्जेंटिना येथे झालेल्या गेल्या विश्वचषकात रौप्य पदक जिंकणारी ईशा सिंग हिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. या विश्वचषकात चिनी खेळाडूंचा बोलबाला पहायला मिळाला आहे.