
IPL 2025 Match Fixing: आयपीएल (IPL) 2025 मध्ये नुकताच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रोमांचक सामना पार पडला. त्यात राजस्थान रॉयल्सचा दोन धावांनी पराभव झाला होता. आता त्यावरून वाद सुरू झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या पराभवावर मॅच फिक्सिंगचे (Match Fixing) आरोप होऊ लागले आहेत. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे एडहॉक कन्वेनर जयदीप बिहानी (Jaydeep Bihani) यांनी या सामन्यात मॅच फिक्सिंगक झाल्याचे म्हटले आहे. सामन्यात राजस्थानला 181 धावांचे लक्ष्य मिळाले होते. संपूर्ण सामन्यादरम्यान, राजस्थान जिंकेल अशी स्थिती होती. शेवटच्या षटकात त्यांना जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे 6 विकेट शिल्लक होत्या. पण लखनौचा गोलंदाज आवेश खानने शानदार गोलंदाजी केली आणि राजस्थानला दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. Ajinkya Rahane Record: अजिंक्य रहाणे, विराट-वॉर्नर यांच्या क्लबमध्ये दाखल; आयपीएलमध्ये रचला 500 चौकारांचा मोठा विक्रम
या पराभवानंतरच राजस्थान संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जयदीप बिहानी यांना या पराभवाबद्दल शंका आहे. त्यांनी संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर असा कसा हरू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. एका मुलाखतीत त्यांनी २०१३ मध्ये राजस्थानमधील काही खेळाडू स्पॉट-फिक्सिंगमध्ये सहभागी होते आणि संघाचा इतिहास थोडा वादग्रस्त राहिल्याची आठवण करून दिली. राज कुंद्रामुळे यापूर्वी संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यावेळीही त्यांनी बीसीसीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर क्रीडा सचिवांनी काय म्हटले?
नीरज के पवन म्हणाले की, राजस्थान स्पोर्ट्स काउन्सिल राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी करू शकत नाही. हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काम आहे.यासाठी एक विशेष देखरेख समिती देखील स्थापन केली आहे. जर एडहॉक समितीकडे फिक्सिंगबाबत कोणत्याही प्रकारचे पुरावे असतील. तर त्यांनी ते आमच्याकडे किंवा थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सोपवावेत.
जयपूरमधील इंडियन प्रीमियर लीग सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स चा 2 धावांनी पराभव प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशन च्या अॅडहॉक कमिटीचे संयोजक आणि भाजप आमदार जयदीप बिहानी यांनी रविवारी रात्री एक निवेदन जारी करून राजस्थान रॉयल्स व्यवस्थापन आणि राज्य क्रीडा परिषदेवर गंभीर आरोप केले.