
IPL 2025 GT vs KKR, Ajinkya Rahane Record: आयपीएल 2025 च्या 39 व्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्स (KKR vs GT) समोर पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना, गुजरात टायटन्सने स्कोअरबोर्डवर 198 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात केकेआर 20 षटकांत फक्त 159 धावाच करू शकला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. कोलकात्याकडून रहाणेने 50 धावांची खेळी केली. पण ती संघाच्या विजयासाठी पुरेशी नव्हती. संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, रहाणेने आपल्या नावावर एक विक्रम नोंदवला आहे. त्याच्या कालच्या खेळीमुळे रहाणेने (Ajinkya Rahane) आयपीएलमध्ये 500 चौकारांचा मोठा टप्पा गाठला.LSG vs DC TATA IPL 2025 Live Streaming: आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामे; जाणून घ्या लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
रहाणेने 36 चेंडूत 50 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्या दमदार अर्धशतकादरम्यान, रहाणेने पाच चौकार मारले. ज्यामुळे आयपीएलमध्ये त्याच्या एकूण चौकारांची संख्या 502 झाली. पाचशए चोकारांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांमध्ये शिखर धवन (768), विराट कोहली (732), डेव्हिड वॉर्नर (664), रोहित शर्मा (609) आणि सुरेश रैना (506) सारख्या दिग्गजांची नावे आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
शिखर धवन – 768 चौकार
विराट कोहली – 732 चौकार
डेव्हिड वॉर्नर – 664 चौकार
रोहित शर्मा – 609 चौकार
सुरेश रैना – 506 चौकार
अजिंक्य रहाणे – 502 चौकार (193 सामन्यात)
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरच्या 199 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना रहाणेने एकट्याने मोठी धावसंख्या उभी केली. बाकीचे फलंदाज फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. तरी रहाणेने कर्णधार म्हणून संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. गुजरातचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने त्याला बाद केले.
आयपीएल 2025 मध्ये रहाणेसाठी फिरकी गोलंदाजी करणे कठीण ठरले आहे. त्याने फिरकी गोलंदाजीविरुद्ध 81 चेंडूत फक्त 100 धावा केल्या आहेत, पाच वेळा बाद झाला आहे, त्याची सरासरी 20.0 आहे आणि डॉट बॉलची टक्केवारी 30.1 आहे. रहाणे बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. रसेलने काही आकर्षक चौकार मारले पण तोही रशीद खानसमोर टिकू शकला नाही.