Amit Shah | X @ANI

सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांची जम्मू कश्मीरला पसंती असते. बर्फात खेळणं, ट्युलिप गार्डन पाहणं यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कश्मीर मध्ये असताना आज पहेलगाम (Pahalgam) मध्ये एका रिसॉर्ट वर पर्यटकांवर हल्ला झाला आहे. सध्या सौदी अरेबिया च्या दौर्‍यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) याच्याशी मोदींचे बोलणं झालं असून पीएम मोदींनी अमित शाह यांना घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

पहलगाम मधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी 'हल्लेखोरांना कठोर शासन केले जाणार' असा इशारा दिला आहे. उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. गृहमंत्री लवकरच सर्व संबंधित एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी श्रीनगरला पोहोचणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. Pahalgam Terror Attack: पहलगाममधील रिसॉर्टवर दहशतवाद्यांचा हल्ला; 12 पर्यटक जखमी, महाराष्ट्रातील एकाचा समावेश .

अमित शाह यांची पहेलगाम हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया

पाकिस्तानचं समर्थन असलेल्या दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंट (TRF)ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमरनाथ यात्रेच्या काही आठवड्यांपूर्वी या प्रदेशात हिंसाचारात वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पहलगाममधील बैसरन येथील एका लोकप्रिय रिसॉर्ट जवळ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. सुरक्षा दल आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिसरात घबराट पसरली. रुग्णवाहिकांनी जखमींना तातडीने जवळच्या वैद्यकीय सुविधांमध्ये नेण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसर सील केला आहे आणि हल्लेखोरांची शोध मोहीम सुरू केली आहे.

हल्लेखोर पळून जाऊ नयेत म्हणून सर्व बाहेर पडण्याच्या मार्गांवर कडक तपासणी करून संपूर्ण प्रदेशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पीडितांना वैद्यकीय उपचार आणि या कृत्यामागील लोकांना जलद न्याय मिळावा ही प्राथमिकता आहे.