Lucknow Super Giants vs Delhi Capitals, 40th Match: टाटा आयपीएल 2025 चा 40 वा सामना आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत स्पर्धेत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दिल्लीने 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 5 सामने जिंकले आणि 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्लीला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, दिल्ली ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and opted to bowl first against @LucknowIPL.
Updates ▶️ https://t.co/nqIO9mb8Bs#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/cJtkQgliTi
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)