
Lucknow Super Giants vs Delhi Capitals, 40th Match: टाटा आयपीएल 2025 चा 40 वा सामना आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत स्पर्धेत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दिल्लीने 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 5 सामने जिंकले आणि 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्लीला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकॉर्ड (LSG vs DC Head to Head Record IPL)
आयपीएलच्या इतिहासात, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स सहा सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या सहा सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले. तरी दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड आहे. कारण ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या साथानावर आहेत. तर, लखनऊ सुपर जायंट्स पाचव्या स्थानावर आहेत.
कशी असेल खेळपट्टी
लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही उपयुक्त आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 18 आयपीएल सामन्यांमध्ये सरासरी धावसंख्या 164 आहे. आयपीएल 2023 मध्ये एलएसजी आणि सीएसके यांच्यातील एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या वर्षी एकाना येथील सरासरी धावसंख्या 195 आहे. या आकडेवारीवरून असे म्हणता येईल की लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडू शकतो.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लखनौ: एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान.
दिल्ली: अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.