
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020 Language Policy) अंतर्गत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी (Hindi Language Maharashtra) ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्याचा आपला आदेश स्थगित केला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse Hindi Statement) यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याप्रकरणी एक नवीन सरकारी ठराव (School Education GR,) जारी केला जाईल, असे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले.
गेल्या आठवड्यात, राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता, ज्यामध्ये काही विरोधी पक्षांचाही समावेश होता.
दादा भुसे यांचे स्पष्टीकरण: हिंदी ही पर्यायी भाषा
- 'NEP अंतर्गत केंद्र सरकारने कोणतीही भाषा सक्तीची केली नाही. हिंदी ही सक्तीची नाही, पर्यायी आहे,' असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले- भुसे
- हिंदी ही मराठीप्रमाणेच देवनागरी लिपीतील असल्याने आणि विद्यार्थ्यांना ती आधीपासून इयत्ता 5 पासून शिकवली जात असल्याने, ती इयत्ता 1 पासून शिकवणे सोपे होईल. मात्र मराठी आणि इंग्रजी या भाषा सक्तीच्या राहतील- भुसे
- तिसऱ्या भाषेचा पर्याय हवा असल्यास, विद्यार्थ्यांची मागणी आणि त्या विषयासाठी शिक्षक उपलब्ध आहेत का हे पाहून निर्णय घेण्यात येईल- भुसे (हेही वाचा, Dress Code For Teachers In Maharashtra: महाराष्ट्रातील शालेय शिक्षकांसाठी ड्रेसकोड- दादा भुसे)
शिवसेना (UBT)- मनसे एकत्र?
दरम्यान, राज्य सरकारने शालेय शिक्षणातील दोन भाषा धोरण रद्द करून तीन भाषा धोरण लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात हिंदी भाषेला इंग्रजी व मराठीसोबत सक्तीची भाषा म्हणून समाविष्ट करण्यात येणार असल्याची चर्चा झाली होती. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला होता. या वादामुळे राज आणि उद्धव ठाकरे हे दोन दशकांनंतर एकाच मुद्द्यावर एकत्र आले. या दोघांनीही मराठीच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे संकेत दिले.
ठाकरे बंधूंचे पुन्हा एकत्र?
पाठिमागील प्रदिर्घ काळ वेगवेगळ्या राजकीय मार्गांनी निघालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधूनी भाषिक मुद्द्यावर एकत्र येण्याचे संकेत दिले. ज्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये 'मराठी माणसाचा हक्क' या भूमिकेवर शिवसेनेची स्थापना केली होती. त्यांचाच पुतण्या राज ठाकरे यांनी 2005 मध्ये पक्षाला रामराम ठोकून 2006 मध्ये MNS ची स्थापना केली, ती देखील मराठी अभिमानाच्या भूमिकेवर. त्यामुळे भाषक आणि प्रांतिक पातळीवर हा मुद्दा अधिक उग्र रुप धारण करणार हे लक्षात येताच सरकारने एक पाऊल मागे जात धोरणात बदल केला.