दौलत जादरान मंकड (Photo Credits: Twitter)

काबुलमध्ये सुरू असलेल्या श्पेपेझा क्रिकेट लीग (Shpageeza League) 2020 मध्ये क्रिकेटने आणखी एका मंकडींग प्रकरणामुळे खेळ भावनेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या वर्षी आयपीएल सामन्यादरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) जोस बटलरला मंकडींग केल्यापासून जगभरातील अनेक टी -20 लीगमध्ये मंकडींग बाद होण्याची सामान्य पद्धत बनली आहे. मंगळवारी अफगाणिस्तान टी-20 लीगमध्ये काबुल ईगल्स (Kabul Eagles) आणि मिस ऐनक नाइट (Mis Ainak Knights) यांच्यात सामना झाला ज्यात एक मंकडींग (Mankading) घटना पाहायला मिळाली. मिस ऐनक नाईट्सचा गोलंदाज दौलत जादरानने (Dawlat Zadran) मंकडींग नियमांतर्गत नूर अली जादरानला आऊट केले. नूर अलीने (Noor Ali) बाद होण्यापूर्वी संघासाठी शानदार फलंदाजी केली आणि 42 चेंडूत 61 धावांचा शानदार डाव खेळला. त्याने या खेळीदरम्यान 3 चौकार आणि 4 षटकार लगावले पण मंकडींग नियमामुळे बाद झाल्यामुळे तो नक्कीच निराश झाला असेल. (रविचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सकडून नाही करता येणार 'मंकड रनआऊट', 13 व्या सीजनपूर्वी रिकी पॉन्टिंगने दिली चेतावणी)

अफगाणिस्तान टी-20 लीगमधील मंकडींगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पण, प्रामुख्याने अफगाणिस्तान टी-20 लीगमध्ये रविचंद्रन अश्विनच्या प्रभावाचे बर्‍याच लोकांनी आभार मानले. दौलत जादरानच्या मंकडींगमुळे पुन्हा एकदा अश्विनने जोस बटलरला केलेल्या मंकडींगच्या आठवणी परत जाग्या झाल्या. आयपीएल 2019 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या सामन्यादरम्यान अश्विनने नॉन-स्ट्राईकला उभ्या असलेल्या बटलरला मंकडींगने बाद केले. बटलर क्रीजच्या बाहेर असताना अश्विनने त्याला मंकड धावबाद केले. पाहा अफगाणिस्तान टी-20 लीगमधील मंकडींगचा व्हिडिओ

यूजर्सने अश्विनच्या प्रभावाचे मानले आभार

अश्विन अण्णाचा प्रभाव

हे कायदेशीर आहे ..

दरम्यान, काबुल ईगल्सने 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून यश मिळवत एक ओव्हर शिल्लक असताना आणि 4 विकेट्सने आरामात सामना जिंकला. सामन्याविषयी बोलायचे तर, पहिले फलंदाजी करत मिस ऐनक नाईट्सने शाहिदुल्लाच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 163 धावांचे आव्हानात्मक पोस्ट केले. शाहिदुल्लाने 51 चेंडूत 58 धावा फटकावल्या. सलामी जोडी नजीब तारकई आणि मोहम्मद शहजाद यांनी अनुक्रमे 32 आणि 22 धावा केल्या. प्रत्युत्तरात नूर अलीच्या 61 आणि सेदिकुल्ला अटलच्या 36 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे काबुल ईगल्स दिलेल्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला आणि 4 विकेटने सामना जिंकला.