Amitabh Bachchan Health: 'सीमा पार दहशतवादी राहतात, अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा नको', यूजरच्या या ट्विटला उत्तर देत शोएब अख्तरने जिंकली मनं
शोएब अख्तर, अमिताभ बच्चन (Photo Credit: Facebook)

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कोरोना व्हायरस असल्याचे जाहीर केल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) बिग बींना यांच्या रिकव्हरीसाठी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या अख्तर यांनी लिहिले होते: “लवकर बरे व्हा, अमिता जी. रिकव्हरीसाठी प्रार्थना.” पण, शोएबवर या ट्विटवर एका यूजरने सुनावलं त्यानंतर 'रावळपिंडी एक्सप्रेस'ने त्याला सडेतोड उत्तर देत चाहत्यांची मनं जिंकली. अमिताभ यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसह (Abhishek Bachchan) मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे समोर आले आहे. अमिताभ आणि अभिषेकनंतर ऐश्वर्या राय आणि नात आराध्या देखील कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे समोर आले. अमिताभ आणि अभिषेक रुग्णालयात असून ऐश्वर्या आणि आराध्या घरीच क्वारंटाइन झाले आहे. (Amitabh Bachchan Health Update: कोरोनाच्या लढाईत अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीत होतोय सुधार; नानावटी रुग्णलयातून समोर आली 'ही' माहिती)

दरम्यान, शोएबच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असताना एका यूजरने त्याच्यावर टीका केली आणि म्हटले, "सीमापार दहशतवादी राहतात... नको आहे कोणत्याही शुभेच्छा." या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अख्तरने म्हटले, "वरचा कधी कोणाचं ऐकेल सांगू शकत नाही. तू लेबल लावल्याने तसं लेबल तयार होणार नाही. देव तुला आशीर्वाद देवो."

पाहा शोएबचे ट्विट:

पाहा शोएबच्या प्रतिक्रियेवर काय म्हणाले यूजर्स

खेळांडूवृत्ती

भारी प्रत्युत्तर शोएब सर

काळजी घ्या

खूप छान

दुसरीकडे, 77 वर्षीय अमिताभ यांचे निवासस्थान स्वच्छ केले गेले असून ते कंटेंट झोन म्हणून घोषित केले गेले आहेत. जया. त्यांची मुलगी श्वेता आणि तिची मुलं नव्या नवेली व अगस्त्य यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. अमिताभ कुठल्याही शूटिंगसाठी बाहेर पडले नसताना त्यांनी 'कौन बनेगा करोडपती'चे घरी बसून प्रोमो शूट केले. त्यांचा कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह असल्याचे अमिताभ यांनी शनिवार ट्विटरद्वारे सांगितले. "मी कोविड पॉझिटिव्हची चाचणी आली आहे.. रुग्णालयात हलविण्यात आले आहे .. रुग्णालय अधिकाऱ्यांना माहिती देत आह... कुटुंब आणि कर्मचार्‍यांच्या चाचण्या घेण्यात आल्या, निकालांची प्रतिक्षा आहे... गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया त्यांची टेस्ट करून घ्यावी ही विनंती!” त्यांनी ट्विटरवर लिहिले.