Amitabh Bachchan Health Update: कोरोनाच्या लढाईत अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीत होतोय सुधार; नानावटी रुग्णलयातून समोर आली 'ही' माहिती
Amitabh Bachchan (Photo Credits: Facebook)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण (Coronavirus) होताच त्यांच्या सर्व चाहत्यांनी जणू काही देवच पाण्यात घालून ठेवले आहेत. काही ठिकाणी तर पूजाअर्चना सुद्धा केल्या जात आहेत, अशा सर्व फॅन्ससाठी आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. कोरोनाविरुद्ध लढत असताना अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यांच्या वयोमानानुसार त्यांना हळूहळू डोस दिले जात आहे. एबीपी न्यूज च्या रिपोर्ट नुसार, अमिताभ हे स्वस्थ आहेत, त्यांचे शरीर उपचारला चांगला प्रतिसाद देत आहे. वयानुसार त्यांच्या फुफ्फुसांची काळजी घेतली जात आहे. हॉस्पिटल मध्ये आल्यापासून ते आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना सुद्धा कोरोनाची लागण; सुदैवाने जया बच्चन COVID 19 निगेटिव्ह

नानावटी रुग्णलयातील अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा बिग बी अमिताभ बच्चन यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते तेव्हा त्यांच्या फुफ्फुसां मधील ऑक्सिजन फारच कमी झाले होते. मात्र आता ही ऑक्सिजन लेव्हल सुद्धा नॉर्मल आहे.अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनातून सुटका व्हावी यासाठी उज्जैन येथे पूजेचे आयोजन, पहा फोटो

दरम्यान, अभिषेक बच्चन ची प्रकृती सुद्धा हळूहळू सुधारत आहे, तर दुसरीकडे, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. या दोघी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहेत. मुंबई महापालिकेने बिग बी यांच्या जलसा बंगल्याला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.कालच्या या ठिकाणीही सॅनिटायजेशन करण्यात आले आहे.