शिखर धवन (Photo Credit: Getty Images)

Shikhar Dhawan Completes 10 Years with Team India: मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) भारतीय क्रिकेट संघाकडून (Indian Cricket Team) 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि "यापेक्षा मोठा सन्मान झाला नाही" असा दावा केला. भारतीय टीमसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दशकपूर्तीबाबत टीवी करताना धवन भावुक झाला आणि मन जिंकणारी पोस्ट शेअर केली. "टीम इंडियासाठी 10 वर्ष, माझ्या देशासाठी खेळण्याची 10 वर्ष, यापेक्षा मोठा सन्मान असूच शकत नाही. माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, आयुष्यभरासाठी या आठवणी लक्षात राहतील. यासाठी मी कायमच आभारी असेन," असं ट्विट धवनने शेअर केलं. धवनने 20 ऑक्टोबर 2010 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'गब्बर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धवनने वनडे क्रिकेटमध्ये संघासाठी 136 सामने खेळले आणि 5,688 धावा केल्या. यात 143 त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. (KXIP vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस, पहिले फलंदाजीचा घेतला निर्णय; दिल्लीसाठी रिषभ पंत IN, तर अजिंक्य रहाणे Out)

पुढीलवर्षी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये डेब्यू केले. 34 वर्षीय याने 34 कसोटी सामने खेळले आणि खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपात त्याने 2,315 धावा केल्या आहेत. सध्या धवन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत असून लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. अलीकडेच धवनने चेन्नई सुपर किंग्जवर पाच गडी राखून विजय मिळवला ज्यात त्याने खेळाच्या छोट्या स्वरूपातील पहिले शतक ठोकले.

सध्या, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल सामना सुरु आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत धवनने आयपीएलमधील तिसरे अर्धशतक ठोकले. यासह धवनने आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठला. हा पराक्रम करणारा एकूण पाचवा तर चौथा भारतीय फलंदाज ठरला. हा लेख लिहीपर्यंत धवन 41 चेंडूत नाबाद 70 धावा करून खेळत आहे.