KXIP vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस, पहिले फलंदाजीचा घेतला निर्णय; दिल्लीसाठी रिषभ पंत IN, तर अजिंक्य रहाणे Out
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

KXIP vs DC, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 38व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) सामने-सामने येतील. किंग्स इलेव्हन आणि कॅपिटल्स यांच्यातील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाईल. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅपिटल्सने आजच्या सामन्यात तीन बदल केले आहेत. दुसरीकडे, पंजाबने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. आयपीएलमधील दोन्ही संघाच्या कामगिरी बाबत बोलायचे तर पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय आवश्यक आहे, तर दिल्लीने 14 गुण मिळवले आहेत आणि त्यांच्यासाठी एक विजय पुरेसा आहे. (KXIP vs DC, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

दिल्लीकडून आजच्या सामन्यातयुवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला असून अजिंक्य रहाणेला बाहेर केले आहे. शिमरॉन हेटमायर आणि डॅनियल सॅम्स यांचा अ‍ॅलेक्स कॅरी आणि एनरिच नॉर्टजे यांच्या जागी समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, किंग्स इलेव्हनने क्रिस जॉर्डनच्या जागी जेम्स नीशमला संधी दिली आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे, तर किंग्ज इलेव्हन पंजाब 9 पैकी 3 सामन्यात विजय मिळवून 6 गुणांसह सहाव्या स्थानी आहेत. या मोसमात दोन संघांमधील ही दुसरी टक्कर असेल. पहिल्या रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने किंग्स इलेव्हनविरुद्ध विजय मिळवला होता.

पाहा किंग्स इलेव्हन आणि कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, कृष्णप्पा गौतम/मुरुगन अश्विन आणि अर्शदीप सिंह.

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे आणि तुषार देशपांडे.