Gabbar Is Back! शिखर धवन पुनरागमन करण्यास उत्सुक, खास अंदाजात गोलंदाजांना दिली चेतावणी, पाहा Photo
गब्बर इज बॅक (Photo Credits: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan) दुखापतीतून सावरला आहे आणि टीम इंडियामध्ये परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. धवनने इंस्टाग्रामद्वारे पुनरागमनाची घोषणा केली. धवनने काही दिवसांपूर्वी आपल्या क्रिकेट चाहत्यांसाठी एनसीएमधील एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो हार्दिक पंड्या आणि ईशांत शर्मासोबत मस्ती करताना दिसला होता. आता धवनने आपल्या इंस्टाग्रामवर एक उत्तम चित्र शेअर फोटो केले आहे. धवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो चष्मा घालून दिमाखदार शैलीत घोड्यावर बसलेला आहे. त्याने हा फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहिले की "तेथे किती गोलंदाज आहेत. गब्बर इज बॅक..." या फोटोमध्ये धवन घोड्यावर स्वार होताना दिसला. (Video: शिखर धवन, हार्दिक पंड्या यांनी 'बोअरिंग' रिहॅब सत्राला बनवले रोचक, पाहून तुम्हीही लागलं नाचयाला)

शिखरने अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सामना केला होता. यावेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली ज्यानंतर त्याला न्यूझीलंड दौर्‍यावरून वगळण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या वनडे सामन्यात धवनला खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 आणि वनडे मालिकेसाठी वगळण्यात आले होते. धवनने आपल्या फोटोच्या कॅप्शनवरून 'शोले' च्या प्रसिद्धी संवादांची आठवण करून दिली. 1975 च्या 'शोले' चित्रपटाचा 'कितने आदमी थे' डायलॉग खूप प्रसिद्ध झाला. धवनने ज्याप्रकारे गोलंदाजांना चेतावणी दिली त्यावरून आतात्यांची त्यांची खैर नाही असेच दिसत आहे. पाहा धवनचा हा 'गब्बर' स्टाईलमध्ये घोड्यावर बसलेला फोटो:

 

View this post on Instagram

 

Kitne bowler they? #Gabbar is back 😎👊🏼

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

दरम्यान, आता धवन बहुधा बांग्लादेशमध्ये आयोजित होणाऱ्या वर्ल्ड इलेव्हनविरुद्ध सामन्यात आशिया इलेव्हनकडून खेळताना दिसू शकेल. भारतीय क्रिकेट बोर्डाने आशिया इलेव्हनसाठी पाठवलेल्या चार भारतीय खेळाडूंपैकी धवनचे नाव असल्याचे म्हटले जात आहे. धवनशिवाय विराट कोहली, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांची नावेही पाठविण्यात आली आहेत. या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केली गेलेली नाही. हे सामने 18 ते 21 मार्च रोजी खेळले जातील.