शेन वार्न ने निवडली भारतीय खेळाडूंची IPL XI; दोन चकित करणाऱ्या खेळाडूंचा समावेश, जाणून घ्या पूर्ण लिस्ट
शेन वार्न (Photo Credit: Getty)

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) माजी कर्णधार आणि 2008 आयपीएल विजेता शेन वॉर्नने (Shane Warne) आयपीएलच्या (IPL) सर्वोत्कृष्ट इलेव्हनची निवड केली. यामध्ये त्याने फक्त भारतीय खेळाडूंचा समावेश के आहे. आणि तो ज्या खेळाडूंसोबत किंवा विरूद्ध खेळला आहेत त्याच खेळाडूंची त्याने निवड केली आहे. वॉर्न म्हणाला की, "2008 मध्ये मला राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची आणि नंतर प्रशिक्षण देण्याची संधी माझ्यासाठी मोठी होती. आमच्या संघात बरेच खेळाडू होते, जेव्हा मी खेळतो तेव्हा त्यांनी माझ्यावर खूप प्रभाव पाडला." त्या दिवसांत मी आयपीएलमध्ये खूप गुंतलो होतो." वॉर्नने आपल्या संघात 3 वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांची निवड केली असून त्यांच्या संघात 6 फलंदाजांचा समावेश आहे. वॉर्नने राजस्थान रॉयल्सच्या अनेक खेळाडूंची महान आयपीएल इलेव्हनमध्ये निवड केली आहे. सिद्धार्थ त्रिवेदीची (Siddharth Trivedi) निवड करुन त्याने सर्वांना चकित केले आहे. सिद्धार्थने आयपीएलच्या पहिल्या सत्रात सर्वांना प्रभावित केले होते. (शेन वॉर्न ने ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट वनडे XI एलन बॉर्डर यांची केली कर्णधार म्हणून निवड; सचिन तेंडुलकर, सहवागचा वर्ल्ड वनडे XI मध्ये समावेश)

याशिवाय वॉर्नने रोहित शर्मा आणि वीरेंद्र सहवागची सलामी फलंदाज म्हणून निवड केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याने या संघात सुरेश रैना, सचिन तेंडुलकरचा समावेश केलेला नाही. रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांपैकी एक आहेत. त्याने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहलीची निवड केली आहे. युवराज सिंह चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडला गेला आहे. यानंतर वॉर्नने युसूफ पठाणची निवड त्याच्या संघात केली आहे. 2008 च्या अंतिम सामन्यात युसूफने एक शानदार डाव खेळला होता. त्याने रवींद्र जडेजाची अष्टपैलू म्हणून निवड केली आहे. याशिवाय हरभजन सिंह, सिद्धार्थ, मुनाफ पटेल आणि झहीर खानचा संघात समावेश आहे.

वॉर्नचा ऑलटाइम इंडियन आयपीएल इलेव्हन: रोहित शर्मा, वीरेंद्र सहवाग, विराट कोहली, युवराज सिंह, यूसुफ पठान, एमएस धोनी (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, हरभजन सिंह, झहीर खान, सिद्धार्थ त्रिवेदी आणि मुनाफ पटेल.