बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या बुद्धीमत्ता आणि मजेदार विधानांसाठी प्रसिद्ध आहे, पण यावेळी सोशल मीडियावर कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तो एक पाऊल अजून पुढे गेला. किंग खानने आपल्या रिकाम्या वेळात सोशल मीडियावर आस्क एसआरके हॅशटॅग (#AskSRK)सुरू केलं आणि स्पष्टपणे त्याच्यासाठी हजारो प्रश्नांची भर पडली. अपेक्षेप्रमाणे त्याची प्रसिद्ध आयपीएल फ्रँचायझी केकेआरवरही प्रश्न पडला होता. या दरम्यान, विवेक सुब्रमण्यम नावाच्या ट्विटर यूजरने शाहरुखला विचारले की शुभमन गिल (Shubhman Gill) याला केकेआर (KKR) टीमचा कर्णधार कधी बनवले जाईल. त्याच्या प्रश्नावर उत्तर देत शाहरुखने मन जिंकणारा प्रतिसाद दिला आणि लिहिले की तुम्हाला केकेआर संघाचा प्रशिक्षक बनताच शुभमन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा कर्णधारपदी विराजमान होईल. यानंतर शाहरुखच्या मजेदार व्यक्तिमत्वाचे सर्वांनीच कौतुक केले.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर, केकेआरही शाहरुखचे कौतुक करण्यापासून थांबवू शकले नाही. कोलकातास्थित फ्रँचायझीने #सावजरिप्लाइज सह ब्रॅंडन मॅक्युलमचा फोटो पोस्ट केला.मॅक्युलमची यंदाच्या हंगामासाठी केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
As soon as KKR makes you the Head Coach my friend. https://t.co/1SSCwWLS8E
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 22, 2020
दिनेश कार्तिकची 2019 च्या आयपीएलमधील कामगिरी काही खास नव्हती, ज्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढले जाईल अश्या चर्चा सुरु होत्या. इयन मॉर्गनला केकेआरच्या संघाची कर्णधारपदे देण्यात यावी, असेही म्हटले जात होते. पण प्रशिक्षक मॅक्युलम यांनी आयपीएल 2020 च्या लिलाव दरम्यान कार्तिक आयपीएल 2020 मध्ये केकेआर संघाचे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, गिल हा भारतीय क्रिकेटमधील एक उभरता चेहरा आहे. जानेवारी 2018 मध्ये त्याला केकेआरने 1.8 कोटी रुपयांत विकत घेतले होते, तेव्हापासून 20 वर्षीय युवा तरूणाने मागे वळून पाहिले नाही आणि आयपीएलच्या प्रतिष्ठित संघासाठी स्फोटक कामगिरी बजावली. आयपीएल 2019 च्या आवृत्तीत, केकेआरकडून यशस्वी मोहिमेनंतर त्याने उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला.