कोच रमाकांत आचरेकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांनी केले भावनिक ट्विट
रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter)

Ramakant Achrekar Death Anniversary: जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे गुरु रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांची आज पुण्यतिथी आहे. सचिनच्या बालपणीचे गुरु आचरेकरांचा गेल्या वर्षी याच दिवशी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. सचिनने आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या गुरूबरोबर स्वतःचा एक जुना फोटो पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या फोटोसह मास्टर ब्लास्टरने मराठीत एक संदेश लिहिला आहे. सचिनने या संदेशाचा अनुवाद इंग्रजीमध्येही पोस्ट केला आहे. या भावनिक संदेशामध्ये सचिनने लिहिले की, 'तुम्ही सतत आमच्या हृदयात राहाल, आचरेकर सर!' आणि सोबत आचरेकरांसह त्याचा जुना फोटो शेअर केला. 2 जानेवारी 2019 रोजी आचरेकरांचे मुंबईत निधन झाले. सचिनने हा संदेश इंस्टाग्रामवर पोस्ट केला. गेल्या वर्षी मुंबईत आचरेकर यांचे निधन झाले तेव्हा सचिनने त्यांची आठवत एक भावनात्मक संदेश लिहिला.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यानेही कोच आचरेकरांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "कोणताही गुरू तुमच्यासारखा असू शकत नाही कारण तुम्ही आम्हाला फक्त चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायलाच शिकवले नाही तर जीवनाचा धडासुद्धा शिकवला आहे. आचरेकर सर मला तुमची खूप आठवण येते."

सचिनची पोस्ट

विनोद कांबळीचा मेसेज

आचरेकर सरांना क्रीडा क्षेत्रातील विशिष्ट योगदानाबद्दल पद्मश्री (देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान) आणि द्रोणाचार्य पुरस्कार (1990) देण्यात आला. सचिनव्यतिरिक्त विनोद कांबळी, प्रवीण अमरे, समीर दिघे, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित आणि बलविंदर सिंह संधू हे आचरेकर सरांचे शिष्य आहेत. एक खेळाडू म्हणून आचरेकरांनी फक्त एका प्रथम श्रेणी सामन्यात भाग घेतला होता, परंतु सचिन लहान असताना त्याला घडविण्यास मोलाचे काम केले.